Delhi Fire – तेलाच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 34 गाड्या घटनास्थळी
दिल्लीत अलीपूर परिसरातील एका गोदामात सोमवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सुमारे 34 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग इतकी भीषण होती की, धुराचे लोट दूरवरून दिसत होते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
#WATCH | Fire fighting operation underway after a fire broke out at a factory in Alipur. 34 fire tenders at the spot
(Video – Fire department) https://t.co/H1N12NfBZK pic.twitter.com/9MSYtnou2j
— ANI (@ANI) March 25, 2024
#WATCH | Delhi: Fire fighting operation underway after a fire broke out at a factory in Alipur pic.twitter.com/A3GE8BOOGv
— ANI (@ANI) March 25, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, ही आग एका तेलाच्या गोदामातून लागली असून व्हर्लपूल कंपनीच्या गोदामालाही याचा फटका बसला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात मोठी गोदामे आहेत. एसी, फ्रीज कॉम्प्रेसर आदींच्या मोठ्या गोदामात ही आग लागली आणि ती हळूहळू जवळच्या किराणा मालाच्या गोदामात पसरली आणि काही वेळातच मोठ्या गोदामांनाही याचा फटका बसला. आग लागताच सर्वजण बाहेर आले त्यामुळे सुदैवाने ते बचावले.आत कोणीही अडकल्याची शक्यता नाही.यात कोट्यवधींचा माल जळून खाक झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.आग इतकी भीषण होती की त्याचे धुराचे लोट दूरवरून दिसत होते. आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. तसेच यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List