सलमानच्या कडेकर असलेल्या या मुलाला ओळखलंत का? ‘भाईजान’च्याच अभिनेत्रीला करतोय डेट

सलमानच्या कडेकर असलेल्या या मुलाला ओळखलंत का? ‘भाईजान’च्याच अभिनेत्रीला करतोय डेट

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खान हा इंडस्ट्रीतील अनेकांसाठी गॉडफादर ठरला आहे. सलमानने अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये लाँच केलंय. यात काही कलाकार असेही आहेत, जे अगदी लहानपणापासून सलमानला ओळखतात. त्याच्या अंगाखांद्यावर ते खेळले आणि सलमानने त्यांना इंडस्ट्रीत लाँच केल्यानंतर ते प्रसिद्ध अभिनेते बनले आहेत. अशाच एका कलाकाराचा फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. या फोटोमध्ये सलमानच्या कडेवर असलेल्या या चिमुकल्या मुलाला ओळखणं कठीणच आहे. खुद्द सलमानने हा फोटो त्याच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट केला होता.

झहीरला बॉलिवूडमध्ये लाँच करण्यापूर्वी 2018 मध्ये सलमानने हा फोटो पोस्ट केला होता. मुलासोबतचा हा फोटो पोस्ट करत सलमानने लिहिलं होतं, ‘या मुलाला उद्या लाँच करणार आहोत. उद्या पाहुयात हा मुलगा आज कसा दिसतो ते.’ फोटोत सलमानच्या कडेवर असलेला हा मुलगा ‘दबंग’मधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला डेट करतोय. या मुलाचं नाव झहीर इक्बाल असं आहे. ‘नोटबुक’मध्ये त्याने भूमिका साकारली होती. मोहनिश बहल यांची मुलगी प्रनुतन बहलसोबत तो झळकला होता.

अभिनेता झहीर इक्वाल रतन्सी त्याच्या रिलेशनशिप स्टेटसमुळेही चर्चेत आला होता. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला तो डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. 2022 मध्ये तिच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट लिहून त्याने चर्चांवर शिक्कामोर्तब केला होता. झहीर 35 वर्षांचा असून त्याच्या कुटुंबीयांचा दागिन्यांचा व्यवसाय आहे. इक्बाल रतन्सी यांचा तो मुलगा आहे. इक्बाल हे अभिनेता सलमान खानचे खास मित्र आहेत. तर इक्बाल यांचा भाऊ सनम रतन्सी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहेत. अगदी लहानपणापासून झहीर सलमानचा चाहता आहे आणि त्यालाच तो मार्गदर्शक म्हणतो. सलमानची बहीण अर्पिता खानसोबत त्याने शालेय शिक्षण पूर्ण केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaheer Iqbal (@iamzahero)

सलमाननेच झहीरला बॉलिवूडमध्ये लाँच केलं. 2019 मध्ये ‘नोटबुक’ या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. यामध्ये अभिनेते मोहनिश बहल यांची मुलगी प्रनुतन बहल हिने झहीरसोबत मुख्य भूमिका साकारली होती. ‘नोटबुक’ या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली होती. मात्र बॉक्स ऑफिसवर त्याला फारसं यश मिळालं नाही. सोनाक्षीच्या आधी झहीरचं नाव दीक्षा सेठ आणि सना सईद या अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;