कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीला तत्वतः मान्यता देणे म्हणजे धूळफेक; रोहित पवार यांचा हल्लाबोल

कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीला तत्वतः मान्यता देणे म्हणजे धूळफेक; रोहित पवार यांचा हल्लाबोल

लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी 7 मार्चला कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीच्या जागेला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. या मुद्द्यावरून राजकारण तापत आहे. आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याला मान्यता म्हणजे धुळफेक असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

कर्जत-जामखेड येथे युवकांना रोजगार मिळावा, यासाठी येथे एमआयडीसीची मागणी रोहित पवार यांच्याकडून होत आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात अनेकदा त्यांनी हा प्रश्नही उपस्थित केला होता. तसेच विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उपोषणही केले होते. त्यांनी सातत्याने हा मुद्दा उचलून धरला आहे.

प्रधान सचिव उद्योग विभाग तथा अध्यक्ष उच्चाधिकार समिती यांच्या अध्यक्षतेखाली 7 मार्चला झालेल्या बैठकीत कर्जत- जामखेड एमआयडीसाला तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती राम शिंदे यांनी दिली. शिंदेंच्या या ट्विटनंतर रोहित पवार यांनी ही निवडणुकांच्या तोंडावरील धुळफेक असल्याचं म्हटले आहे.

याबाबत केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, कर्जत-जामखेडच्या MIDC ला तत्वतः मान्यता दिल्याचा प्रकार म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रोष ओढवू नये म्हणून लोकांच्या डोळ्यात केलेली निव्वळ धूळफेक आहे. MIDC च्या जागेची व्यवहार्यता (फिजिबिलीटी) तपासल्यानंतर संबंधित जागा योग्य असेल तरच पुढची प्रक्रिया करता येते. परंतु हे इतिवृत्त काळजीपूर्वक वाचलं तर कंटूर सर्व्हे करणं, औद्योगिक क्षेत्राची व्यवहार्यता तपासणं किंवा उद्योजकांच्या मागणीची आणि शाश्वत पाणीपुरवठ्याची खातरजमा करणं अशा अनेक अटींच्या अधीन राहून दिलेली ही तत्त्वतः मान्यता आहे. त्यामुळं या इतिवृत्तातील या गोष्टीच अप्रत्यक्षपणे सांगतात की #MIDC ला दिलेली ही तत्वतः मान्यता म्हणजे शून्य रुपये असलेल्या खात्याचा कधीही न वटणारा मोठ्ठ्या रकमेचा चेक आहे. आपल्या नेत्यांना ज्याप्रमाणे #अटी, #तत्वतः मान्यता याची सवय आहे त्या सवयीसारखीच हीही तत्वतः मान्यता आहे. यातून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असला तरी यातील सत्य मी लवकरच सविस्तरपणे मांडणार आहे.

#MIDC ची प्रक्रिया ही प्रदिर्घ असते आणि मी सुचविलेल्या जागेवर ती संपूर्ण प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. पण केवळ मला श्रेय मिळू नये म्हणून सरकारवर दबाव आणून हा प्रस्ताव मंजूर करु दिला जात नाही. कर्जत-जामखेडमधील युवांच्या भविष्याशी उघडउघड खेळलेला हा खेळ आहे. पण हे सत्य आम्ही लपवू देणार नाही आणि कर्जत-जामखेडच्या भरल्या ताटात माती कालवणाऱ्यांना उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;