हर्षित राणाला दंड

वृत्तसंस्था/ कोलकाता

2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील येथील इडन गार्डन्स मैदानावर शनिवारी झालेल्या सनरायजर्स हैदराबाद संघाविरुद्धच्या सामन्यात मैदानात बेशिस्त वर्तन केल्याच्या कारणावरून केकेआरचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला आयपीएलच्या शिस्तपालन समितीने दंड ठोठावला आहे.

या सामन्यात केकेआर संघाने सनरायजर्स हैदराबादचा केवळ 4 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात खेळताना हर्षित राणाकडून हैदराबाद संघाचा खेळाडू मयांक अगरवाल बाद झाल्यानंतर हर्षित राणाकडून मैदानामध्ये आनंद व्यक्त करताना फ्लाईंग किस करीत त्याला निरोप दिला. या कृतीतून हर्षित राणाकडून आयपीएलच्या शिस्तपालन नियमाचा भंग झाल्याने त्याला आता मिळणाऱ्या मानधन रकमेतील 60 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावा लागेल. या अटीतटीच्या सामन्यात हर्षित राणाने डावातील शेवटच्या षटकामध्ये हैदराबादला विजयासाठीच्या 13 धावा घेण्यापासून रोखण्यात यश मिळवले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;