टॅरिफमुळे टरकली! पाकिस्तानचे मंत्री पोहोचले अमेरिकेत
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच केलेल्या घोषणेनुसार विविध देशांवर वाढीव टॅरिफ लावणे सुरू केले आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानची टरकली आहे. टॅरिफ लागू नये म्हणून पाकची धावाधाव सुरू असून त्यांचे मंत्री अमेरिकेला रवाना झाले आहेत.
पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांनी अमेरिकेत जाऊन तेथील अधिकाऱयांशी चर्चा केली. वाढीव टॅरिफची अंमलबजावणी तातडीने केली जाऊ नये, अशी विनवणी त्यांनी केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. अमेरिकेने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या दोन्ही देशांमध्ये व्यापारी सहकार्यावर चर्चा सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच अमेरिकेकडून अधिपृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List