खड्ड्यांमुळे ‘लाल परी’ खिळखिळी; एसटी बसगाड्यांचे अपघात, दुरुस्तीचे प्रमाण वाढले
राज्याच्या कानाकोपऱयात धावणारी ‘लाल परी’ रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे अक्षरशः खिळखिळी झाली आहे. यंदाच्या पावसाळय़ात निपृष्ट बांधकाम केलेल्या बहुतांश रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले असून त्याचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. मागील तीन महिन्यांत एसटी बसगाडय़ांचे अपघात तसेच दुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आधीच तोटय़ात असलेल्या महामंडळावर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडला आहे. गतिमान विकासाचा दिखावा करणाऱया सरकारच्या निष्क्रियतेची पोलखोल यातून झाली आहे.
कार्यशाळांमध्ये कमी मनुष्यबळ
एसटी महामंडळाच्या कार्यशाळांमध्ये टायर फिटर, इलेक्ट्रिशियन्स, वाहन निरीक्षक आदी पदांवर काम करणाऱया कामगारांचे 30 ते 35 टक्के मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे बसगाडय़ांची देखभाल वेळेवर करणे मुश्कील बनले आहे. सध्या कार्यरत कामगारांवर देखभालीचा ताण पडला असून आगाऊ देखभाल करणे शक्य होत नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List