भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या पत्नीची लक्झरी कार चोरीला, गुन्हा दाखल

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या पत्नीची लक्झरी कार चोरीला, गुन्हा दाखल

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची पत्नी मल्लिका नड्डा यांची लक्झरी कार चोरी झाली आहे. दिल्लीतील एका सर्व्हिस सेंटरमधून ही कार चोरी झाल्याची माहिती मिळतेय. मार्च रोजी ही घटना घडली असून चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नड्डा यांच्या पत्नीची फॉर्च्यूनर कार (क्र. एचपी 03 डी 0021) चालक दिल्लीतील गोविंदपुरी भागातील एका सर्व्हिस सेंटरला घेऊन गेला होता. 19 मार्च रोजी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान ही कार चोरी झाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

राजधानी दिल्लीमध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसांगणिक वाढ होत आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की दिल्ली-एनसीआरमध्ये दर मिनिटाला एक गाडी चोरीला होती. एसीकएच्या एका अहवालानुसार 2022 आणि 2023मध्ये हिंदुस्थानमध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये तब्बल अडीच पट वाढ झाली आहे. या रिपोर्टमध्ये आणखीही काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. चोरांची नजर कोणत्या वाहनांवर असते? चोरीच्या घटनांचे हॉटस्पॉट कोणते? कोणत्या शहरात सर्वाधिक वाहन चोरी होते? याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये दर 14 मिनिटांनी एक वाहन चोरी होते. 2013 पासून वाहन चोरीचे दररोज 105 गुन्हे दाखल झाले आहेत. बहुतांश घटना या मंगळवार, रविवार आणि गुरुवारी झाल्या आहेत. त्यामुळे या दिवशी वाहनधारकांना सतर्क राहण्याची गरज आहे. अर्थात या तीन दिवशीच चोरीच्या घटना जास्त का होतात यामागील कारण स्पष्ट झालेले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;