हैदराबादहून फुकेतला निघालेले एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान 16 मिनिटांतच परतले, कारण काय?
हैदराबादहून फुकेतला निघालेले एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान उड्डाणानंतर 16 मिनिटांतच माघारी परतले. उड्डाणानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर माघारी वळवण्यात आले. एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी निवेदन जारी करत घटनेची पुष्टी केली.
हैदराबाद विमानतळावरून एअर एक्सप्रेसचे बोईंग 737 मॅक्स 8 द्वारे संचालित IX110 या विमानाने शनिवारी सकाळी उड्डाण घेतले. नियोजित वेळेनुसार 11.45 वाजता हे विमान फुकेतमध्ये उतरणे अपेक्षित होते. मात्र उड्डाणानंतर 16 मिनिटांतच विमानात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे विमान पुन्हा हैदराबादमधील विमानतळावर माघारी वळवण्यात आले.
एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी निवेदन जारी करत घटनेला दुजोरा दिला. तांत्रिक समस्येमुळे वैमानिकाने हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनात म्हटले आहे. एअरलाइनकडून पर्यायी विमानाची व्यवस्था केली असून विलंबाच्या वेळी प्रवाशांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. प्रवाशांनी झालेल्या गैरसोयीबद्दल खेद असल्याचेही असे प्रवक्त्याने पुढे म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List