Raigad News – पावसाळी पर्यटनासाठी आलेला मुंबईचा पर्यटक पाझर तलावात बुडाला
पावसाळी पर्यटनासाठी खालापूर तालुक्यातील लोधीवली गेलेल्या मुंबईतील इसमाचा फणसाड धरणात बुडून मृत्यू झाला. सुनील मोरे असे मयताचे नाव असून ते मुंबईतील गोवंडी येथील रहिवासी होते. पाण्याचा अंदाज न आल्याने सुनील पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस आणि हेल्प फाऊंडेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन तास शोध घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
गोवंडी येथील 12 जण तीन रिक्षातून खालापूर येथील लोधीवलीतील पाझर तलावावर गेले होते. मजा करत असताना सुनील मोरे हे पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी सुनीलचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेनासाठी चौक ग्रामीण रुग्णालयात पाठवला. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List