Air India Plane Crash – बेजबाबदार वार्तांकन प्रकरणी डब्ल्यूएसजे आणि रॉयटर्सला पायलट फेडरेशनकडून नोटीस

Air India Plane Crash – बेजबाबदार वार्तांकन प्रकरणी डब्ल्यूएसजे आणि रॉयटर्सला पायलट फेडरेशनकडून नोटीस

अहमदाबादमधील विमान दुर्घटनाप्रकरणी अहवाल सादर करण्यात आले आहेत. तसेच या घटनेचे बेजबाबदारपणे वार्तांकन केल्याप्रकरणी द फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स (एफआयपी) ने द वॉल स्ट्रीट जर्नल आणि रॉयटर्सविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. 12 जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या अपघाताबाबतच्या त्यांच्या अलिकडच्या अहवालांनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. ज्यात पायलटची चूक किंवा कॉकपिटमधील गोंधळ हे अपघाताचे संभाव्य कारण असल्याचे नमूद केले आहे. या माध्यमांच्या वृत्तांतात कोणताही ठोस पुरावा नसताना ‘पायलटच्या चुकीमुळे’ अपघात झाल्याचे म्हटले आहे. जे पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे आहे, असा आरोप फेडरेशनने केला आहे. या घटनेचे अयोग्य आणि बेजबाबदारपणे वार्तांकन केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

एफआयपीने पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये, या माध्यम संघटनांकडून औपचारिक माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे आणि त्यांचे वृत्तांकन ‘निवडक आणि असत्यापित’ असे वर्णन करण्यात आले आहे. एफआयपीच्या निवेदनात म्हटले आहे की असे वृत्तांकन ‘बेजबाबदार’ आहे, विशेषतः जेव्हा चौकशी अजूनही सुरू आहे. आम्ही अशाप्रकारचे वार्तांकन अत्यंत बेजबाबदार आहे आणि त्यामुळे मृत वैमानिकांच्या प्रतिष्ठेला गंभीर आणि कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. रॉयटर्सने शोकग्रस्त कुटुंबांना अनावश्यक त्रास दिला आहे आणि प्रचंड दबाव आणि सार्वजनिक जबाबदारीखाली काम करणाऱ्या वैमानिक समुदायाचे मनोबल कमी केले आहे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

विमान वाहतूक उद्योगाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता किंवा भीती पसरवण्याची ही वेळ नाही. कोणत्याही तथ्यात्मक पुष्टीशिवाय असे वार्तांकन अयोग्य आहे. अधिकृत चौकशी पूर्ण होईपर्यंत माध्यमांनी कोणतेही अंदाज वर्तवू नये किंवा कोणतेही निष्कर्ष काढू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. एएआयबी (एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो) ने जारी केलेल्या सुरुवातीच्या अहवालानुसार, क्रॅश होण्यापूर्वीच क्रॅश झालेल्या विमानाच्या इंजिनचा इंधन नियंत्रण स्विच ‘रन’ वरून ‘कटऑफ’ वर गेला होता, ज्यामुळे दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा थांबला होता. या स्विचबाबत दोन्ही वैमानिकांमध्ये संभाषण झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टी ‘सायलेंट किलर’;  शरीरात विषासारख्या पसरतात स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टी ‘सायलेंट किलर’; शरीरात विषासारख्या पसरतात
आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी ठेवल्या जातात ज्या अन्नाची चव वाढवतात पण त्या हळूहळू आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्या...
Ratnagiri News – मुंबई गोवा महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या टॅंकरला आग
अमेरिकेत भरधाव कारने 30 जणांना चिरडले, सात जणांची प्रकृती गंभीर
Photo – मुंबईतून कोल्हापूरच्या राजाचे प्रस्थान
Photo – प्रियदर्शनीचा हॉट गुलाबी लूक!
महाकाली ढोकळा खात नाही, मतदारांना आकर्षित करण्याचा मोदींचा प्रयत्न फसलाय; महुआ मोइत्रा यांचा टोला
बनावट नोटा अर्थव्यवस्थेला गंभीर धोका; दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण मत