गाझातील कॅथलिक चर्चवर चुकून हल्ला – नेतन्याहू
गाझातील एकमेव होली फॅमिली कॅथलिक चर्चवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. हल्ल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी खेद आणि मृतांबद्दल शोक व्यक्त केला. गाझातील फॅमिली कॅथलिक चर्चवर इस्रायली सैन्याने हल्ला केला. यात तिघे ठार आणि एका पाद्रीसह दहा जण जखमी झाले.
या चर्चमध्ये शेकडो विस्थापित लोकांनी आश्रय घेतला होता. नेतन्याहू यांनी याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पह्नवर चर्चा केली. नेतन्याहू म्हणाले, हा हल्ला चुकून झाला. ज्यात चर्चवर एक शेल पडला. प्रत्येक निष्पाप जिवाचे नुकसान हे भयंकर आहे. इस्रायली सैन्य आयडीएफनेही चौकशीनंतर हा हल्ला चुकून झाल्याचे म्हटले आहे. नागरिकांचे आणि धार्मिक स्थळांचे नुकसान होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली होती, असा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. दरम्यान, इटलीचे पंतप्रधान मेलोनी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून असे हल्ले स्वीकारले जाणार नाहीत असे म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List