गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्स बार, अनिल परब यांची खळबळ

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्स बार, अनिल परब यांची खळबळ

कांदिवलीतील एक डान्सबार गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे आहे आणि या बारवर छापा टाकून 22 बारबालांना पकडण्यात आले, असा गौप्यस्फोट करत शिवसेना आमदार अनिल परब यांनी आज विधान परिषदेत खळबळ उडवून दिली.

कांदिवली येथील सावली बार अॅण्ड रेस्टॉरंटवर 30 मे 2025 साली समतानगर पोलीस ठाणे आणि युनिट नंबर 12 च्या पोलिसांनी डान्स बार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने छापा टाकला. या छाप्यात 22 बारबाला, 12 गिऱहाईक आणि 4 कर्मचाऱयांना अटक केली. पंचनाम्यानंतर सर्व कारवाई पूर्ण झाल्यावर पोलिसांच्या स्टेटमेंटमध्ये या डान्स बारचे परमिट गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती रामदास कदम यांच्या नावे असल्याचे स्पष्ट झाले. एखादा मंत्री त्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का, असा सवाल करत आर. आर. पाटील यांनी डान्स बार व्यवसाय बंद केला होता, मात्र आता समाजात मान्यता नसलेल्या या डान्स बार व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचे काम गृह राज्यमंत्र्यांच्या घरात होत आहे. या राज्यात आमदार सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत आणि गृह राज्यमंत्र्यांच्या कृपेने डान्स बार चालतो, असे अनिल परब म्हणाले. परब यांनी यावेळी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.

परब यांनी केलेल्या आरोपांवेळी मी सभागृहात नव्हतो. नंतर त्यांच्याकडून समजून घेईन आणि त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य असेल तर त्यावर विचार केला जाईल, असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधान परिषदेत अनिल परब यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना राज्यातील अनधिकृत वाळू उपसा आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत सरकारला धारेवर धरले. अनधिकृत वाळू उपशावर ते म्हणाले, रत्नागिरीतील जगबुडी नदीतून अवैध गाळ आणि वाळू उपसा सुरू आहे. हा गाळ योगिता दंत विद्यालयात टाकला जात आहे. महसूल राज्यमंत्री यात संचालक होते. योगेश कदम यांच्या बहिणीच्या नावाने ते आहे. त्यांच्या वडिलांच्या नावही संचालक मंडळावर आहे. रत्नागिरीत महसूल राज्यमंत्री यांच्या कृपेने अवैध उपसा सुरू आहे. वाळू काढल्यानंतर पहिल्यांदा गरीबांना वाळू देण्याचे धोरण आहे, मात्र असे न करता ही वाळू थेट महसूल राज्यमंत्र्यांच्या घरी जाते, असा आरोप अनिल परब यांनी केला. यावेळी त्यांनी दलालांची नावे वाचून दाखवली. दलाल आकीद मुकादम राज्यमंत्र्यांचा माणूस आहे. बिपीन पाटणे, संजय कदम हे सर्व महसूल राज्यमंत्र्यांचे कार्यकर्ते आहेत, असे सांगत त्यांनी ड्रोनने काढलेले फोटो तसेच निवडणुकीतील फोटो सभागृहात दाखवले.

आमचा काहीही संबंध नाही !

कांदिवलीतील डान्स बार प्रकरणात आमचा काहीही थेट संबंध नाही. माझा आणि माझ्या आईची बदनामी करण्यासाठीच हे आरोप लावण्यात आले आहेत. त्यांनी लावलेले आरोप हे खोटे आहेत. त्यांनी सभागृहात जी कागदपत्रे दाखवली ती खोटी असल्याचे मी सिद्ध करेन, असे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!

वाळू आणि गाळ उपसाप्रकरणी एकाच दलालाला कंत्राट दिले जाते. बाकी कोणालाही कंत्राट दिलेले नाही. वाळू उपसाप्रकरणी मी पुराव्यानिशी बोलत आहे. मी माझे आरोप आज पुराव्यानिशी सिद्ध केले आहेत. कांदिवली डान्स बारची बातमी बाहेर जाऊ नये म्हणून आता तो डान्स बार तोडून टाकला आहे, मात्र मी स्वतः जाऊन बघून आलो. अवैध वाळू उपसा आणि डान्स बार परमिटप्रकरणी मी केलेले आरोप हे पुराव्यानिशी केले आहेत. सभागृहात पुरावे दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रकरणी गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी शिवसेना आमदार अनिल परब यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारतात सर्वाधिक खाल्ले जाणारे लोकप्रिय 7 खाद्यपदार्थ परदेशात पूर्णपणे ‘बॅन’; खाल्ले तर थेट शिक्षीच, कारण वाचून आश्चर्य वाटेल भारतात सर्वाधिक खाल्ले जाणारे लोकप्रिय 7 खाद्यपदार्थ परदेशात पूर्णपणे ‘बॅन’; खाल्ले तर थेट शिक्षीच, कारण वाचून आश्चर्य वाटेल
भारतीय लोक खाण्या-पिण्याचे खूप शौकीन असतात. आणि आपण जेव्हा जेव्हा खाद्यसंस्कृतीचा विचार करतो तेव्हा सर्वात आधी भारताचं नाव समोर येत....
शिक्षक नाही, राक्षस; 23 शाळकरी मुलींचं लैगिक शोषण, व्हिडीओही बनवले, 59 वर्षीय नराधमाला अटक
Air India Plane Crash – बेजबाबदार वार्तांकन प्रकरणी डब्ल्यूएसजे आणि रॉयटर्सला पायलट फेडरेशनकडून नोटीस
Shah Rukh Khan injured – ‘किंग’च्या सेटवर शाहरूख खानला दुखापत, उपचारांसाठी तातडीनं अमेरिकेला रवाना
Pandharpur news – विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या 3 महिला चंद्रभागेत बुडाल्या; दोघींचे मृतदेह सापडले, तिसरीचा शोध सुरू
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा! किती धोकादायक हा आजार, त्यावर उपचार काय?
महाड MIDC तील कंपनीला आग, अग्रिशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला