Lok Sabha Election 2024 बच्चू कडू महायुतीविरोधात लढणार, अमरावतीतून देणार उमेदवार

Lok Sabha Election 2024 बच्चू कडू महायुतीविरोधात लढणार, अमरावतीतून देणार उमेदवार

प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी वेळोवेळी महायुतीबाबत त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. बच्चू कडू यांच्या पक्षाने अमरावती लोकसभा मतदार संघाची मागणी केली होती. मात्र उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीची जागा भाजपच लढेल असे जाहीर केले होते. त्यामुळे बच्‍चू कडू यांनी महायुतीविरोधात जात अमरावतीची जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

बच्चू कडू यांनी अमरावतीतून उमेदवार जाहीर करणार असल्याचे सांगतच 6 एप्रिलला ते उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार आहेत. दरम्यान भाजपच्या कमळ चिन्हावर अमरावतीतून खासदार नवनीत राणा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. राणा सध्या अमरावतीत प्रचार करत आहे. त्यामुळे बच्‍चू कडू यांच्‍या प्रहार जनशक्‍ती पक्षाने निवडणुक लढण्याचे ठरवल्याने महायुतीच्‍या अडचणी वाढणार आहेत.

याआधीही बच्चू कडू यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. ‘वेळ आलीच तर महायुतीतून बाहेर पडून आम्ही लोकसभेसाठी उमेदवार देऊ,’ असा इशारा भाजपच्या नेत्यांना दिला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. पण बच्चू कडू यांनी या जागेवर दावा केला आहे. या ठिकाणी आमचे दोन आमदार आहेत. किमान एक लाख आमची मते आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर आमचाच दावा आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थिती नवनीत राणा यांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;