दिल्ली हादरली, चार वर्षाच्या मुलीवर शिक्षकाच्या भावाने केला बलात्कार

दिल्ली हादरली, चार वर्षाच्या मुलीवर शिक्षकाच्या भावाने केला बलात्कार

दिल्लीतील पांडव नगर भागात एका चार वर्षीय मुलीवर तिच्या ट्युशनच्या शिक्षकाच्या भावाने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अरमान नावाच्या नराधमाला अटक केली आहे.

पूर्व दिल्लीतील पांडव नगर भागातील या मुलीवर शनिवारी रात्री एका 34 वर्षीय तरुणाने बलात्कार केला. मुलीने घरी येऊन तिच्यासोबत घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. या प्रकरणी त्यांनी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अरमानला अटक केली असून त्याच्यावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीच्या घराबाहेर संतप्त जनतेची तोडफोड

या घटनेबाबत पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याचे काही मेसेज व्हायरल झाले होते.त्यानंतर आसपासच्या परिसरतील जनता आरोपीच्या घराबाहेर जमा झाली व त्यांनी निदर्शने केली. यावेळी संतप्त जमावाने आरोपीच्या गाडीची व दुकानाची तोडफोड केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;