… तर राज्यांचे अस्तित्वच धोक्यात येईल; उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपवर हल्लाबोल

… तर राज्यांचे अस्तित्वच धोक्यात येईल; उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपवर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकांमुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. इंडिया आघाडीमुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जात आहे. याच मुद्द्यावरून उदयनिदी स्टॅलिन यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत पुन्हा हे सरकार सत्ते आले तर राज्यांचे अस्तित्व धोक्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक देश आणि राज्यासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आला होता. आता उदयनिधी स्टॅलिन यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. एका रॅलीला संबोधित करताना उदयनिधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. पुन्हा हे सरकार सत्तेत आले तर राज्यांना धोका आहे, असे ते म्हणाले.

केंद्र सरकार समान प्रमाणात निधीचे वाटप करत नाही. राज्यांकडून कराच्या रुपात एक रुपयाचा महसूल केंद्राला जात असेल तर त्यातील फक्त 28 पैसे राज्याला परत मिळतात. तसेच भाजप शासित राज्यांना केंद्राकडून जास्त महसूल मिळतो, असा आरोपही त्यांनी केला. केंद्राने तमिळनाडूचा निधी अडवला असून अनेक विकासाचे प्रकल्प रोखून धरले आहेत. निवडणुका जवळ येतात, तेव्हाच पंतप्रधान तमिळनाडूत येतात. इतरवेळी ते इकडे पाहतही नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;