सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान; जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार गटावर आरोप

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान; जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार गटावर आरोप

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयाने आगामी निवडणुकीसाठी अजित पवार गटाला सशर्त घड्याळ चिन्ह वापरायला परवानगी दिली आहे. तर शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला त्यांच्या चिन्हाखाली एक टिप्पणी लिहायला सांगितली आहे. अजित पवार गटाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत टिप्पणी नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

अजित पवार गटाने इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमांमध्ये नोटीस जारी करावी आणि प्रचाराच्या सर्व जाहिरातींमध्ये असे नमूद करावं की, त्यांना निवडणूक आयोगाने दिलेलं ‘घड्याळ’ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी हे पक्षनाव याबाबतचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अजित पवार गटाकडून प्रसारमाध्यमात जाहिरात देण्यात आल्या आहेत, त्यावरून आव्हाड यांनी ट्विट करत आरोप केले आहेत.

आव्हाड यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने प्रसारीत केलेल्या जाहिरातींमधील शब्दांचा सर्वोच्च न्यायालयाच्या टीप्पणीचा कुठेही शाब्दिक संदर्भ दिसून येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात ज्या बाबी न्यायालयाने नमूद केल्या नव्हत्या; त्या बाबी जाहिरातीमध्ये नमूद करून सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून अवमानच केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचाही सन्मान करण्यात येत नसेल तर याला सत्तेची मग्रुरी नाही तर काय म्हणायचे? असा सवालही आव्हाड यांनी ट्विटमध्ये केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;