क्रिकेटचा स्टेडियम अन् वाद.. शाहरुख खानवर पुन्हा कारवाई होणार?
बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान नुकताच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध हैदराबाद सनराइजर्सचा (SRH) आयपीएल मॅच पाहण्यासाठी मैदानात पोहोचला होता. आता स्टेडियमवरील शाहरुखचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा फोटो पाहिल्यानंतर शाहरुख स्टेडियमवर स्मोकिंग करत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. शाहरुखचा हा फोटो नीट पाहिला तर त्याने तोंडाजवळ काहीतरी पकडल्याचं दिसून येत आहे, मात्र ती गोष्ट सिगारेटच आहे की नाही हे स्पष्ट होत नाही. मात्र व्हिआयपी बॉक्समध्ये उभा राहून शाहरुख सिगारेट ओढतोय, अशी कमेंट काहींनी केली आहे.
क्रिकेट स्टेडियमसंदर्भात शाहरुख खानचा हा काही पहिलाच वाद नाही. याआधी त्याच्यावर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बंदी घालण्यात आली होती. ग्राऊंडवर शाहरुखने स्टाफसोबत वाद घातला होता, त्यानंतर त्याच्यावर पाच वर्षांपर्यंत बंदी घालण्यात आली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List