विरोधकांना संपवण्याचं भाजपचं षडयंत्र! केजरीवाल यांच्या अटकेविरोधात 31 मार्चला ‘इंडिया’ची मेगा रॅली

विरोधकांना संपवण्याचं भाजपचं षडयंत्र! केजरीवाल यांच्या अटकेविरोधात 31 मार्चला ‘इंडिया’ची मेगा रॅली

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचा प्रमुख चेहरा असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद यांना ईडीने अटक केली. त्याआधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही अटक करण्यात आली. ऐन निवडणुकीमध्ये हे अटकसत्र सुरू झाल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. या अटकेविरोधात ‘इंडिया’ आघाडीने 31 मार्च रोजी राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर मेगा रॅली आयोजित केली आहे. रविवारी दिल्लीमध्ये झालेल्या काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा करण्यात आली.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आप नेते आणि दिल्लीचे कॅबिनेट मंत्री गोपाल राय म्हणाले की, “घटनेवर प्रेम करणाऱ्या आणि घटनेचा सन्मान करणाऱ्या देशभरातील लोकांमध्ये केजरीवाल यांच्या अटकेनंतर संतपाची लाट उसळली आहे. ही कारवाई फक्त केजरीवाल यांच्याविरोधातच नसून एक-एक करून विरोधी पक्ष संपवण्याचे षडयंत्र भाजपने रचले आहे. यासाठी पंतप्रधान मोदी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. आमदारांची खरेदी केली जात आहे. आमदारांना पैसे देऊन खरेदी जात असून दुसरीकडे तपास यंत्रणांचा धाक दाखवून भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. जे लोक झुकले नाहीत, विकले नाहीत त्यांच्याविरोधात खोटे खटले दाखल करण्यात आले.”

काँग्रेस नेते अरविंदर सिंह लवली म्हणाले की, लोकशाहीमध्ये विरोधकांना निवडणूक लढण्याची समान संधी मिळायला हवी. पण काँग्रेसची खाती गोठवण्यात आली आहे. ईडीच्या आडून मुख्यमंत्र्यांना अटक केली जात आहे. 31 मार्चला राजकीय नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी, केंद्र सरकारविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी रॅली आयोजित करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;