भाजप केजरीवाल यांना घाबरते, निवडणूक प्रचारापासून रोखण्यासाठी अटक; भगवंत मान यांचा हल्लाबोल

भाजप केजरीवाल यांना घाबरते, निवडणूक प्रचारापासून रोखण्यासाठी अटक; भगवंत मान यांचा हल्लाबोल

भारतीय जनता पक्ष अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या विकासाभिमूख राजकारणाला घाबरते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रचारात उतरू नये यासाठीच त्यांना अटक करण्यात आली, असे विधान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केले. ‘इंडिया टूडे’शी बोलताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाईल हे आम्ही सुरुवातीपासून बोलत होतो. केजरीवाल यांच्यासारखा बडा नेता आपल्याविरोधात प्रचारात उतरू नये अशी भाजपची इच्छा होती. ते केजरीवाल यांना घाबरतात. त्यामुळे त्यांनी आम आदमी पार्टी आणि केजरीवाल यांना संपवण्याचा विडा उचलला आहे, असा आरोप भगवंत मान यांनी केला.

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 28 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. केजरीवाल यांच्या अटकेमुळे आपच्या निवडणूक प्रचाराला खिळ बसली आहे. त्यामुळे नेत्यांसह कार्यकर्तेही केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले असून ठिकठिकाणी सरकारचा निषेध सुरू आहे.

केजरीवाल यांना राजकीय सूडबुद्धीने अटक करण्यात आली आहे. याआधी या प्रकरणात शरदचंद्र रेड्डीला अटक झाली होती. त्याने आपण केजरीवाल यांना कधीही भेटलो नाही अशी कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करून तुरुंगात ठेवण्यात आले. तुरुंगात टाकल्यानंतर त्याने आपण केजरीवाल यांच्याविरोधात साक्ष दिली. तो जामिनावरही बाहेर आला. आता त्याचे नाव निवडणूक रोख्यांच्या घोटाळ्यात येत असून त्याच्या कंपन्यांनी 50 कोटीहून अधिक रुपयांचे निवडणूक रोखे भाजपला दिल्याचे समोर आले आहे, असेही भगवंत मान म्हणाले.

तपास यंत्रणा भाजपच्या हातचे बाहुले झाल्या आहेत. ईडी, सीबीआय, आयकर विभाग, निती आयोग या भाजपच्या शाखा आहेत. भाजपची सत्ता असणाऱ्या एकाही राज्यामध्ये तपास यंत्रणा धाडी टाकत नाहीत. त्यांचा फक्त विरोधकांना संपवण्यासाठी वापर केला जात आहे, असा आरोप मान यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;