शिर्डीत होळीचा उत्साह; गुरुस्थान मंदिरासमोर विधीवत पूजा
शिर्डीत होळी उत्सवानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. लग सुटी आल्यामुळे अनेक भाविक साईबाबांच्या दर्शनाला आले आहेत. मंदिर विश्वस्त व्यवस्थेतर्फे पारंपरिक पद्धतीने होली साजरी करण्यात येत आहे.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेतर्फे श्री गुरुस्थान मंदिरासमोर होळी स्थापन करून त्याची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्यांची पत्नी ज्योती हुलवळे यांच्या हस्ते होळीची पुजा करण्यात आली. याप्रसंगी संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List