करिश्मा कपूरची खरी ओळख काय? अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

करिश्मा कपूरची खरी ओळख काय? अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

अभिनेत्री करिश्मा कपूर कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. पण करिश्मा अनेक वर्षांनंतर पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे सर्वत्र अभिनेत्रीचं कौतुक होत आहे. करिना हिने ‘मर्डर मुबारक’ सिनेमातून अभिनय विश्वात पुन्हा पदार्पण केलं आहे. सिनेमा 15 मार्चे 2024 रोजी प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्रीने सिनेमाचं प्रदर्शन देखील दमदार केलं. मुलाखतींच्या माध्यमातून करिश्माने स्वतःबद्दल अशा अनेक गोष्टी सांगितल्या ज्या फार कमा लोकांना माहिती आहेत… नुकताच झालेल्या एका मुलाखतीत करिश्मा हिने तिच्या नावाचा अर्थ आणि उच्चाराबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा कपूर हिची चर्चा रंगली आहे.

करिश्मा कपूर स्वतःच्या नावाची ओळख करून देत म्हणाली, माझ्या नावाचं उच्चारण करिज्मा (chaarisma) असं आहे. करिश्मा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून माला करिश्मा कपूर म्हणून हाक मारली जाते. पण माझं खरं नाव करिज्मा असं आहे. अभिनेत्रीने स्वतःच्या नावाबद्दल खुलासा जाणून अभिनेते पंकज त्रिपाठी देखील थक्क झाले. ते म्हणाले, ‘मला माहितीच नव्हतं… मी आजपर्यंत तिला करिश्मा करिश्मा असंच म्हणतो…

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझं नातं ब्रिटींशांसोबत देखील आहे… माझ्या आजी नाव बारबरा होतं आणि ती ब्रिटीश महिला होती. म्हणून मी आणि करीना लहानपणापासून आजीसोबत पबमध्ये जायचो…’ सध्या सर्वत्र करिश्मा कपूर हिची चर्चा रंगली आहे. चाहेत देखील अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

सांगायचं झालं तर, करिश्मा कपूर हिने 90 च्या दशकात अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

करिश्मा कपूर हिचं लग्न उद्योजक संजय कपूर याच्यासोबत झालं होते. पण दोघांचं लग्न फार वर्ष टिकलं नाही. दोन मुलांच्या जन्मानंतर देखील करिश्मा – संजय यांच्यातील वाद कमी झाले नाहीत. घटस्फोटानंतर संजय याने दुसरा संसार थाटला तर, करिश्माने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. करिश्मा आता ‘सिंगल मदर’ म्हणून दोन मुलांचा सांभाळ करत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;