घड्याळ तर जाणारच अन् वेळेचा अंदाज आताच येतोय; रोहित पवार यांचा अजित पवार गटावर निशाणा

घड्याळ तर जाणारच अन् वेळेचा अंदाज आताच येतोय; रोहित पवार यांचा अजित पवार गटावर निशाणा

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयाने आगामी निवडणुकीसाठी अजित पवार गटाला सशर्त घड्याळ चिन्ह वापरायला परवानगी दिली आहे. तर शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला त्यांच्या चिन्हाखाली एक टिप्पणी लिहायला सांगितली आहे. अजित पवार गटाने चिन्हाखाली लिहिलेल्या सूचनेवरून रोहित पवार यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.

“भारत निवडणूक आयोगाने अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह दिले आहे. हे प्रकरण सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर आहे आणि अंतिम निकालाच्या अधीन राहून माननीय सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी सर्व निवडणुकांसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे”, अशी सूचना अजित पवार गटाने त्यांच्या चिन्हाखाली लिहिली आहे.

या सूचनेचा उल्लेख करत रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट केली आहे. रोहित पवार म्हणाले, “या निवेदनातील पहिलं वाक्य खरं असलं तरी लाल चौकटीतील अर्ध वाक्य अधिक सत्य आहे. कारण अंतिम निकालात न्यायालयाने परवानगी दिली तरच घड्याळ चिन्ह पुढे वापरता येईल, अन्यथा घड्याळ तर जाईलच पण वेळ कशी येईल याचा अंदाज लोकांचा विरोध बघता आजच येतोय. राजकारणाला अशा अटी लागू होत असतील तर याचं दुःख वाटतं. पण विचार बदलल्यामुळे आणि ज्याचं राजकारणच विरोधी पक्षाला संपवण्याच्या अटीवर चालतं त्यांच्यासोबत गेल्याने ही वेळ आली, हे नाकारता येणार नाही!”, असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टद्वारे रोहित पवार यांनी अजित पवार गटाला चांगलाच टोला लगावला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;