या संकटाच्या काळात आम्ही केजरीवाल यांच्यासोबत आहोत; कल्पना सोरेन यांचा सुनिता केजरीवालांशी संवाद

या संकटाच्या काळात आम्ही केजरीवाल यांच्यासोबत आहोत; कल्पना सोरेन यांचा सुनिता केजरीवालांशी संवाद

कथित मद्यधोरण घोटाळाप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्याशी संवाद साधत त्यांना धीर दिला आहे. या संकटाच्या काळात आम्ही केजरीवाल यांच्यासोबत आहोत, असे कल्पना सोरेन म्हणाल्या. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्याशी आपण नुकताच संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. एक सहकारी म्हणून त्यांचे दुः ख मी समजू शकते. देशात लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असताना देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना बेकायदेशीर अटक करणे ही लोकशाहीसाठी सामान्य घटना नाही. संकटाच्या या काळात हेमंत सोरेन यांच्या नेतृत्त्वाखालील झारखंड केजरीवाल यांच्यासोबत आहे, असे कल्पना सोरेन यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही ईडीने अटक केली होती. देसात लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असताना असी बेकायदा कारवाई करणे योग्य नसल्याचे कल्पना सोरेन यांनी म्हटले आहे. सुनीता केजरीवाल यांनी शनिवारी अरविंद केजरीवाल यांचा संदेश जनतेपर्यंत पोहचवला आहे. आपण लवकरच बाहेर येऊन जनतेला दिलेली आश्वसने पूर्ण करणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. तसेच या काळात कल्पना सोरेन यांनी सुनीत यांच्याशी संवाद साधत त्यांना धीर दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;