‘केजरीवालच मोदींचा काळ आहे’, म्हणणारे ‘आप’चे् आमदार तपास यंत्रणाच्या रडारवर; IT चा छापा

‘केजरीवालच मोदींचा काळ आहे’, म्हणणारे ‘आप’चे् आमदार तपास यंत्रणाच्या रडारवर; IT चा छापा

कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संजोयक अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी अटक केली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये मुख्यमंत्र्यांनाच अटक झाल्याने ‘आप’ नेते आणि कार्यकर्तेही आक्रमक झाले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या आडून शिखंडी डाव खेळणाऱ्या भाजपवर आप नेते तुटून पडले आहेत. केजरीवाल यांच्या अटकेवरून टीकेची राळ उठलेली असताना आपचे आणखी काही नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आले असून आपचे आमदार गुलामब सिंह यादव यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकल्याचे वृत्त आहे.

माझा जन्मच संघर्षासाठी; तुरुंगातून संदेश… तुम्ही फार काळ मला जेलमध्ये रोखू शकणार नाही

अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आपच्या नेत्यांनी एकामागोमाग एक ट्विट करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. राजधानी दिल्लीतील मटियाला मतदारसंघाचे आमदार गुलाब सिंह यादव यांनीही एक ट्विट केले होते. अरविंद केजरीवाल हेच मोदींचा ‘काळ’ असल्याचे बोचरे ट्विट त्यांनी केले होते. यानंतर लागलीच त्यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला. ‘एएआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

AAP के एक और MLA के खिलाफ एक्शन! ठिकानों पर IT का छापा, कहा था- अरविंद केजरीवाल हैं PM नरेंद्र मोदी का काल

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;