Jalna crime news – भामट्याने लांबवले अडीच लाख, बँकेत भरणा करण्याआधीच मारला पिशवीवर डल्ला

Jalna crime news – भामट्याने लांबवले अडीच लाख, बँकेत भरणा करण्याआधीच मारला पिशवीवर डल्ला

बँकेत भरणा करण्यासाठी आणलेले 2 लाख 30 हजारांची रोकड असलेली पिशवी चोरट्याने चक्क काऊंटरवरून पळवली. ही धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेत घडली आहे. चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शेवगा येथील रामेश्वर गणेश बारहाते हे अंबड तहसील येथे महसूल सहाय्यक म्हणून नोकरी करतात. त्यांनी बँकेत भरणा करण्यासाठी 2 लाख 30 हजार रुपयांची रोकड लाल रंगाच्या कापडी पिशवीमध्ये आणली होती. बँकेच्या काऊंटरवर पिशवी ठेऊन ते मित्रासोबत गप्पा मारत होते. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या चोरट्यांनी संधी साधत पैशांची पिशवी घेऊन पळ काढला. हा सर्व प्रकार बँकेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

चोरीची घटना घडल्यानंतर बारहाते यांनी तात्काळ अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले आहे. या फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध सुरू करण्यात आल्याचे अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी सांगितले.

मित्राकडून हात उसणे पैसे आणले

कौडगाव येथील मित्र नितिन झनझने याच्याकडून 2 महिन्यांपूर्वी घरगुती कामासाठी हात उसणे पैसे घेतले होते. तेच पैसे परत करण्यासाठी सासऱ्यांकडून 8 दिवसांपूर्वी 2 लाख 30 हजार रुपये घरी आणून ठेवले होते. हेच पैसे नितिन झनझने यांच्या नावाची स्लिप भरून बँकेत भरणा करत असताना चोरट्याने लांबवल्याचे रामेश्वर बारहाते यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 26 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 26 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवसात...
खडकवासला मतदारसंघ, मशीनमधील मतदान स्लिप गहाळ झाल्याचा आरोप
मोदींच्या परदेश दौऱ्यावर पाच वर्षांत 362 कोटींचा चुराडा
मुंबईत कायद्याचे राज्य राहणार नाही, हायकोर्टाचे गंभीर निरीक्षण; महापालिकेत नक्कीच चुकीचं घडतंय 
100 दिवसांच्या प्रगतीपुस्तकात शिंदेंचा गृहनिर्माण विभाग मागेच, 66 पैकी 21 उद्दिष्टे अद्याप गाठता आली नाहीत
ट्रेंड – हरे कृष्ण…
घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा