Benefits Of Walking – दररोज गवतावर चालण्याचे हे 5 आरोग्यवर्धक फायदे

Benefits Of Walking – दररोज गवतावर चालण्याचे हे 5 आरोग्यवर्धक फायदे

आपल्याला निरोगी राहण्यासाठी चालण्याचा सल्ला दिला जातो. ताजी हवा, कोवळे ऊन आणि शांत वातावरण सकाळी असते, म्हणूनच ही वेळ व्यायामासाठी अतिशय उत्तम मानली जाते. ताज्या हवेतील ऑक्सिजन मुळे आपले स्वास्थ्य सुधारते. कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरास मिळते. तसेच सकाळच्या शांत वातावरणामुळे रिलॅक्स राहायलाही मदत मिळते.  नॅचरोपॅथी ही उपचारपद्धती निसर्गातील पंचभूतांशी निगडीत असते, त्यापैकी एक म्हणजे पृथ्वी.  त्यातून येणार्‍या मॅगनेटीक लहरींमध्ये आरोग्यासाठी गुणकारी अशी उर्जा सामावलेली असते. त्याचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो.

चालण्यामुळे आपल्या कॅलरी कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळेच आपण दिवसभर फ्रेश राहतो. म्हणूनच दिवसभर फ्रेश राहण्यासाठी सकाळचा व्यायाम किंवा मॉर्निंग वाॅक करण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जातो. मात्र चालण्याचा हा व्यायाम हिरवळीवर केल्यास तुमच्या आरोग्यास आणि विशेषतः डोळ्यांसाठी फारच फायदेशीर  ठरतो. मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यासोबतच आरोग्यदायी  कारणांसाठी नक्की सकाळी हिरवळीवर चाला.

हिरवळीवर चालण्याचे फायदे

हिरवळीचा हिरवा रंग शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात.

गवतावर चालण्यामुळे आपल्या पायाच्या तळव्यावरील बिंदूवर प्रेशर येणे हे आपल्या शरीरासाठी उत्तम असते.

 

दररोज फक्त ३० मिनिटे चाला, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, कर्करोग आदी रोगांवर मात करा!

तळव्यावर पडलेल्या प्रेशरमुळे शरीरास खूप चांगले लाभ मिळतात. विशेषतः डोळे, कान, फुफ्फुस, चेहरा, पोट, मेंदू, किडनी यांचे काही पाॅईटस् हे तळव्यामध्ये असतात. त्यामुळे हिरवळीवरून चालताना या अवयवांसाठी फायदेशीर ठरते. परिणामी निरोगी स्वास्थ्यासाठी हा व्यायाम फायदेशीर ठरतो.

सकाळी हिरवळीवर चालण्यामुळे शरीराचे संतुलन सुधारण्यास मदत होते. आपण चालताना शरीराचा सारा भार आपल्या पायांवर असतो. विशेषतः पहिल्या बोटावर!

डोळ्यांचे आरोग्य सुधारणारे  रिफ्रॅक्सोलॉजी प्रेशर पॉईंटस दुसर्‍या आणि तिसर्‍या बोटामध्ये असते. त्यामुळे हिरवळीवर चालण्याचा सर्वाधिक फायदा डोळ्यांसाठी होतो.

पृथ्वी आणि या मॅगनेटीक लहरींच्या एकत्र येण्यामुळे शरीरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. परिणामी त्यातून उद्भवणारे आजार रोखण्यासही मदत होते. सकाळी अनवाणी गवतावर चालण्याचे शरीरासाठी इतके सारे फायदे आहेत. त्यामुळे आजपासून किमान 10 मिनिटे तुम्ही अनवाणी चालण्याची सवय लावून घ्या. जेणेकरून तुमचे आरोग्यही उत्तम सुधारेल.

(कोणतेही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा
घरात ढेपूण झाले तर काही सोपे घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी चादरी, उशाचे कव्हर, पडद्यासह अन्य कपडे गरम पाण्याने धुवा....
मंत्रालयात सिलिंग कोसळले
वाहनांच्या काचेला क्रॅश पडला तर… काय करायचं?
महाराष्ट्रात माय मराठीची गळचेपी सुरूच, ‘हिंदी’साठी मराठी चित्रपटाला स्क्रीन नाकारली
माघी उत्सवातील बाप्पांचे 2 ऑगस्टला विसर्जन! सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विघ्न दूर
विद्यापीठाच्या जागेवरील एसआरएला स्थगिती
साक्षीदार फोडण्यासाठी गुन्हेगारांना वेळ मिळावा म्हणून खटले मुद्दाम लांबवले जात आहेत, हाच ‘गेम प्लान’ बनलाय! सर्वोच्च न्यायालयाला चिंता