जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, चौघांना अटक; दारुगोळा जप्त
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरुच आहे. स्थानिकांच्या मदतीने सुरक्षा दलाला आणि नागरिकांवर हल्ले करून ‘टार्गेट किलिंग’ही गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे. यामुळे सुरक्षादल अलर्ट झाले असून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांच्या नाड्या आवळण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच मोहिमे अंतर्गत सुरक्षादलाने नौगाम येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मॉड्यूलचा पर्दाफाश करत चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि कागदपत्र जप्त करण्यात आली आहे.
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या चौघांना सुरक्षा दलाने अटक केली आहे. मोहम्मद यासीन भट, शेराज अहमद राथर, गुलाम हसन खांडेय आणि इम्तियाज अहमद भट (सर्व रा. श्रीनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे जम्मू-कश्मीर पोलीस, 50 आरआर, व्हॅली क्यूआरटी आणि 29 बीएन सीआरपीफ बटालियनने शनिवारी सायंकाळी नौगाम पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या केनिहामा भागामध्ये सापळा रचला. यादरम्यान एका कारला रोखून त्याची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात हत्यारं आढळून आली.
सुरक्षा दलाला कारममधून एक एके-56 रायफस, एके-56 रायफलच्या तीन मॅकझीन, 75 जीवंत काडतुसं, दोन मॅकझीनसोबत एक ग्लॉक पिस्तूल, नऊ एमएमची 26 जीवंत काडतुस, चिनी बनावटीचे सहा ग्रेनेडसह काही आक्षेपार्ह गोष्टीही जप्त करत चौघांना अटक केली. त्यांच्याविरोधात नौगाम पोलीस स्थानकात भादवी कलम 18, 23, 39 यूएपीए, 7/25 आर्म्स एक्ट आणि 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
J-K: JeM terror module in Srinagar busted; 4 held
Read @ANI Story | https://t.co/mwG1qzcSdB#JammuAndKashmir #srinagarpolice pic.twitter.com/YidWp1oZ17
— ANI Digital (@ani_digital) March 24, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List