होळीनंतर उन्हाचा चटका वाढणार; पारा 40 पार जाण्याची शक्यता

होळीनंतर उन्हाचा चटका वाढणार; पारा 40 पार जाण्याची शक्यता

ग्लोबल वार्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढीमुळे वातावरणात बदल होत आहेत. यंदा पावसाने ओढ दिली. तसेच राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. तसेच गेल्या काही वर्षांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यंदा एल निनोचा फारसा प्रभाव नसल्याने सध्या उन्हाचे चटके बसत नसले तरी एप्रिल महिन्यात राज्यात अनेक भागात पारा 40 अंशांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदा मार्च महिन्यातही रात्री आणि पहाटे गारवा जाणवत असून दुपारी कडक उन असते. आता उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी होत असून राज्यात उन्हाचा ताप वाढणार आहे. दरवर्षी विदर्भ, मराठवाडा, खान्देश या भागात एप्रिल मे महिन्यात पारा 45 अंशांवर जातो. यंदा मार्च महिन्यात तापमानात जास्त वाढ झाली नसली तरी एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा चांगलाच ताप जाणवणार आहे.

उत्तरेतही थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी होत असून उत्तर हिंदुस्थानातही तापमानात वाढ होत आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड येथे कमाल तापमानात वाढ होत आहे. आता होळीनंतर राज्यासह देशात उन्हाचा ताप वाढणार आहे. तसेच काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दुपारच्यावेळी घराबाहेर पडू नये आणि उन्हापासून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;