…त्यांना याची किंमत चुकवावीच लागेल; रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचा इशारा
रशियावरील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने पावले उचलली आहेत. या हल्ल्याप्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली असून त्यात गोळीबार करणाऱ्या 4 जणांचा दहशतवाद्यांचाही समावेश आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर एका कारने युक्रेनच्या दिशेने पळ काढत असताना सुरक्षा दलाने त्यांना अटक केली. या हल्ल्यात 133 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना याची किंमत चुकवावीच लागेल, असा इशारा दिला आहे.
या हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्वांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. निष्पाप लोकांवर हल्ला करणाऱ्यांना याची किंमत चुकवावीच लागेल. रशिया या हल्ल्यातील हल्लेखोरांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल, असे पुतीन यांनी सांगितले. तसेच या हल्ल्यातील जखमींवर योग्य ते उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या हल्ल्याची जबाबदारी इसिसने घेतली आहे. या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List