शिवसैनिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

शिवसैनिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

वडाळा विधानसभेतील सयानी रोड नाका येथील इराणी चाळीच्या दुसऱ्या मजल्यावर घरगुती रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन आग लागली. यावेळी शिवसेनेचे गटप्रमुख सचिन देसाई यांनी प्रसंगावधान दाखवत त्वरित आग विझवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्याचवेळी चाळीचे रहिवासी, शाखा समन्वयक चंदन साळुंखे यांनी त्वरित पोलीस प्रशासन व अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. सुदैवाने या स्पह्टात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मदतकार्यासाठी शाखा संघटक संजना पाटील, युवासेना विधानसभा चिटणीस जीत विरा, उपशाखाप्रमुख संजय मात्रे, उपशाखा समन्वयक सुनील पेडणेकर, गटप्रमुख सचिन हिरवे, अमोल बोरकर, रितेश पाटील, ओमकार बेर्डे, मयूर शिंदे उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;