लंकेची बांगलादेशवर 211 धावांची आघाडी

फर्नांडो, रजिता, कुमारा यांची प्रभावी गोलंदाजी, लंका दु. डाव 5 बाद 119

वृत्तसंस्था/ सिलेत

यजमान बांगलादेश आणि लंका यांच्यात येथे सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर लंकेने दुसऱ्या डावात 5 बाद 119 धावा जमवित बांगलादेशवर एकूण 211 धावांची आघाडी मिळवली आहे. बांगलादेशचा पहिला डाव 188 धावात आटोपल्यानंतर लंकेने पहिल्या डावात 92 धावांची बढत मिळवली. या सामन्यातील खेळाचा दुसरा दिवस पुन्हा गोलंदाजांनी गाजवताना 12 गडी बाद केले.

या सामन्यात लंकेचा पहिला डाव 280 धावात आटोपल्यानंतर बांगलादेशने 3 बाद 32 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा प. डाव 51.3 षटकात 188 धावात आटोपला. बांगलादेशच्या पहिल्या डावात ताजुल इस्लामने सर्वाधिक म्हणजे 6 चौकारासह 47 धावा जमवल्या. लिटॉन दासने 4 चौकारांसह 25, शहदात हुसेनने 3 चौकारांसह 18, मेहदी हसन मिराजने 1 चौकारांसह 11, शोरीफुल इस्लामने 2 षटकारासह 15, खलिल अहमदने 2 षटकार आणि 1 चौकारांसह 22 धावा जमवल्या. लंकेच्या अचूक गोलंदाजीसमोर बांगलादेशचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. लंकेतर्फे विश्वा फर्नांडोने 48 धावात 4 तर रजिताने 56 धावात 3 तसेच कुमाराने 31 धावात 3 गडी बाद केले.

पहिल्या डावात 92 धावांची आघाडी घेणाऱ्या लंकेने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली पण दिवसअखेर त्यांनी दुसऱ्या डावात 35 षटकात 5 बाद 119 धावा जमवल्या. सलामीच्या करुणारत्नेने एकाकी लढत देत 101 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 52 धावा जमवल्या. सलामीचा मधुष्का 1 चौकारांसह 10 धावावर बाद झाला. कुशल मेंडिसने 3 धावा केल्या. अँजेलो मॅथ्यूजने 3 चौकारांसह 22 धावा जमवल्या. चंडिमलला आपले खाते उघडता आले नाही. कर्णधार धनंजय डिसिल्वा 3 चौकारांसह 23 धावावर तर विश्वा फर्नांडो 2 धावावर खेळत आहे. बांगलादेशतर्फे नाहीद राणाने 2 तर एस. इस्लाम, टी. इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : लंका प. डाव सर्वबाद 280, बांगलादेश प. डाव 51.3 षटकात सर्वबाद 188 (ताजुल इस्लाम 47, शहदात हुसेन 18, लिटॉन दास 25, मेहदी हसन 11, एस. इस्लाम 15, खलिद अहमद 22, मेहमुदुल हसन जॉय 12, अवांतर 19, विश्वा फर्नांडो 4-48, रजिता 3-56, कुमारा 3-31), लंका दु. डाव 36 षटकात 5 बाद 119 (मधुष्का 10, करुणारत्ने 52, कुशल मेंडिस 3, मॅथ्यूज 22, चंडिमल 0, धनंजय डिसिल्वा खेळत आहे 23, व्ही. फर्नांडो खेळत आहे 2, अवांतर 7, नाहीद राणा 2-42,  एस. इस्लाम, टी. इस्लाम आणि मेहदी हसन मिराज प्रत्येकी एक बळी).

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;