Jackie Shroff | आज अर्ध्या अंधेरीवर असतं जॅकी श्रॉफ यांचं राज्य, पण…,त्यांच्याकडून खंत व्यक्त

Jackie Shroff | आज अर्ध्या अंधेरीवर असतं जॅकी श्रॉफ यांचं राज्य, पण…,त्यांच्याकडून खंत व्यक्त

अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. गेल्या 40 पेक्षा अधिक वर्षांपासून जॅकी श्रॉफ बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. जॅकी श्रॉफ यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आणि बॉलिवूडवर आणि चाहत्यांच्या मनावर त्यांनी राज्य केलं. पण अभिनेत्याने आयुष्यात काही चुकीचे निर्णय घेतले, ज्याचा पश्चाताप आजही त्यांना होत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी मनातील खंत अखेर बोलून दाखवली…

आयुष्यात घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयावर पश्चाताप व्यक्त करत जॅकी श्रॉफ म्हणाले, ‘योग्य विचार करुन मी माझे पैसे एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवायला हवे होते. पण तेव्हा मी फक्त कार खरेदी केल्या. अनेक कार मी खरेदी केल्या. जर तेव्हा मी माझे पैसे कार खरेदी करण्यासाठी लावले नसते तर, आज अर्ध्या अंधेरीवर माझं राज्य असतं…’ असं देखील जॅकी श्रॉफ म्हणाले.

पुढे जॅकी श्रॉफ म्हणाले, ‘पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्याला प्राधान्य न देता मी कार खरेदी केल्या..’, जॅकी श्रॉफ यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी कार आणि बाईक्सची प्रचंड आवड आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये वेग-वेगळ्या प्रकारच्या महागड्या गाड्या आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जॅकी श्रॉफ यांची चर्चा रंगली आहे. जॅकी श्रॉफ कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतात.

जॅकी श्रॉफ यांच्या मुलाची प्रॉपर्टी

जॅकी श्रॉफ यांचा मुलागा आणि अभिनेता टायगर श्रॉफ कायम नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्यास प्राधान्य देतो. नुकताच अभिनेत्याने पुण्यात नवीन घर घेतलं आहे. . रिपोर्टनुसार, अभिनेत्याच्या नव्या घराची किंमत 7.5 कोटी रुपये आहे. नव्या घरासाठी अभिनेत्याने 52.5 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी भरली आहे. मुंबईत देखील टायगर याचं 8 बीएचके फ्लॅट आहे. ज्याची किंमत 35 कोटी रुपये आहे.

टायगर श्रॉफ नवं घर घेण्यास का देतो प्राधान्य?

एका मुलाखतीत अभिनेत्याने कायम नवं घरेदी करण्याचं कारण सांगितलं होतं. जॅकी श्रॉफच्या प्रॉडक्शनचा ‘बूम’ सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर त्यांना स्वतःचं घर देखील विकावं लागलं होतं. तेव्हापासून टायगर कायम नवीन घर खरेदी करण्यास प्राधान्य देतो. सध्या श्रॉफ कुटुंबाची चर्चा रंगली आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;