बदला घेण्यासाठी विद्यार्थिनीने रचला डांबल्याचा बनाव, तोफखाना पोलिसांकडून गुन्हा रद्दचा प्रस्ताव

बदला घेण्यासाठी विद्यार्थिनीने रचला डांबल्याचा बनाव, तोफखाना पोलिसांकडून गुन्हा रद्दचा प्रस्ताव

नगर शहरातील प्रतिथयश महाविद्यालयातील एका तरुणीला हातपाय बांधून तिच्या अंगावर बेंच टाकून डांबून ठेवल्याचा कथित प्रकार हा बनाव असल्याचे उघड करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले. तरुणीने एका तरुणाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुह्याचे कामकाज न्यायालयासमोर सुरू झाले असून, त्यात फायदा मिळावा म्हणून तरुणाचा बदला घेण्याच्या भावनेतून तरुणीने डांबून ठेवल्याचे षडयंत्र रचल्याचे उघड झाले. दरम्यान, तोफखाना पोलिसांनी आता हा गुन्हाच रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

नगरमधील नामांकित महाविद्यालयातील पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱया मुलीचे हातपाय बांधून तिच्या अंगावर बेंच टाकून तिला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला होता. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर मुलीने दिलेल्या माहितीनुसार तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन-चार अनोळखी तरुणांनी तिला वर्गातील खोलीत मारहाण केली आणि डांबून ठेवले होते. या तरुणांनी वर्गातील बेंच अंगावर टाकले. त्यातून जखमाही झाल्याचे तिने त्यात म्हटले होते. या प्रकाराने महाविद्यालय आणि शहरात खळबळ उडाली होती. पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सदर घटनेची माहिती मिळताच, तोफखाना पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. घटनाक्रम आणि घटनास्थळासह सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही घटनाच संशयास्पद असल्याचे समोर आले. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यातही काहीच आढळून आले नाही. यानंतर सदर मुलीला पोलिसांनी विश्वासात घेतले असता, हा संपूर्ण प्रकार बनाव असल्याचे तिने कबूल केले. यापूर्वी विनयभंग आणि छेड काढल्याप्रकरणी या तरुणीने एका तरुणावर गुन्हा दाखल केला होता. डांबल्याप्रकरणी या तरुणीने त्याच तरुणावर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी याबाबत अधिक माहिती घेतली असता सदर तरुणाला गुह्यात अडकविण्यासाठी आपण हा बनाव रचल्याचे तिने कबूल केले. तोफखाना पोलिसांनी अत्यंत योग्य पद्धतीने हा गुन्हा हाताळला आणि खोटा गुन्हा उघडकीस आणला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;