टॉयलेट आणि बाथरूममध्येही तुम्हाला कॅमेरे लावायचेत का? ईडीला न्यायालयाने फैलावर घेतले

टॉयलेट आणि बाथरूममध्येही तुम्हाला कॅमेरे लावायचेत का? ईडीला न्यायालयाने फैलावर घेतले

कर्करोगावर उपचार घेत असलेले जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना रुग्णालयात त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊ देण्यास विरोध करणाऱ्या ईडीला विशेष पीएमएलए न्यायालयाने चांगलेच फटकारले. तुम्ही मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेल्या विनंतीवर एवढय़ा विलक्षण पद्धतीने विरोध करताय. तुम्हाला टॉयलेट आणि बाथरूममध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे आहेत का, असा खरमरीत सवाल न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी केला आणि ईडीच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला.

नरेश गोयल सध्या गिरगाव येथील एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. यादरम्यान वैयक्तिक मदतनीस नेमण्यास तसेच कुटुंबीयांना भेट घेण्यास परवानगी द्या, अशी विनंती करीत गोयल यांनी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला होता. न्यायाधीश देशपांडे यांनी त्यांची विनंती मान्य केली. याचवेळी ईडीच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. कर्करोगावर उपचार घेत असलेल्या व्यक्तीला मूलभूत दैनंदिन नैसर्गिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरुष मदतनीसची आवश्यकता असते. रुग्णालयात ही भूमिका गोयल यांची मुलगी किंवा पत्नी पार पाडू शकते का? असा प्रश्न न्यायालयाने सुनावणीवेळी केला होता. त्यावर ईडीकडे उत्तर नव्हते.

– ईडीने अकाली निष्कर्ष काढत गोयल यांना दोषी ठरवणारी भूमिका मांडली. त्यावरही न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. ईडीला फौजदारी न्यायशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाचा विसर पडला आहे. जोपर्यंत आरोपीचे दोषत्व वाजवी संशयापलीकडे सिद्ध होत नाही तोपर्यंत तो आरोपी निर्दोष मानला जातो, याची जाणीव ईडीला असायला हवी, असा टोला न्यायालयाने लगावला आहे.

टिप्पण्या करू नका, पटत नसेल तर हायकोर्टात जा!
गोयल यांच्या अर्जाला विरोध करताना ईडीने पीएमएलए न्यायालयाच्या आधीच्या आदेशांवर टिप्पणी केली होती. न्यायालयाने यापूर्वी गोयल यांचे वृद्धत्व आणि प्रकृतीचा विचार करीत अनेक सुविधा देणारे आदेश दिले आहेत. अशा स्वातंत्र्याचा गैरवापर केला जाऊ शकतो, असे ईडीने आपल्या उत्तरात म्हटले होते. यावरूनही न्यायालयाने ईडीला झापले आहे. ईडीने आधीच्या आदेशांवर टिप्पण्या करीत बसू नये. कुठला आदेश पटला नसेल तर उच्च न्यायालयात आव्हान द्यावे, असे न्यायालयाने सुनावले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;