अविनाश जाधव यांना मध्यरात्री 3 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं, मीरा-भाईंदरमधील मोर्चाआधी मोठी कारवाई

अविनाश जाधव यांना मध्यरात्री 3 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं, मीरा-भाईंदरमधील मोर्चाआधी मोठी कारवाई

मीरा-भाईंदरमधील मराठी मोर्चाआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि ठाणे-पालघरचे विभागप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मध्यरात्री तीनच्या सुमारास काशिमीरा पोलिसांनी ही कारवाई केली.

अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर म्हणून मीरा-भाईंदरमध्ये मंगळवारी 8 जुलै रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून सर्वपक्षीय मराठी मोर्चाीच हाक देण्यात आली होती. सकाळी 10 वाजता हा मोर्चा निघणार होता. मात्र तत्पूर्वीच नाट्यमय घडामोडी घडल्या आणि पोलिसांनी अविनाश जाधव यांच्यासह मनसे आणि इतर पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तत्पूर्वी पोलिसांनी जाधव यांना मीरा-भाईंदर क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करणारी नोटीस बजावली होती. त्यामुळे अमराठी व्यापाऱ्यांना मोर्चाची परवानगी मिळते, मग मराठी माणसांना का नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मीरारोड येथील एका अमराठी व्यावसायिकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्यामुळे या भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. मनसेकडून झालेल्या या मारहाणीनंतर, परीसरातील अमराठी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करुनच निषेध व्यक्त केला. तसेच तेथील व्यापाऱ्यांनी मोर्चा देखील काढला होता. या सर्व घडामोडीनंतर मराठी माणूस जागा झाला. याच पार्श्वभूमीवर 8 जुलै रोजी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि समविचारी संस्था, तसेच सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र प्रेमी यांच्या वतीने मीरा-भाईंदर येथे मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसासाठी ‘मराठी मोर्चा’ची हाक देण्यात आली होती. मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;