इस्लामी दहशतवाद्यांचा रशियावर हल्ला, 115 ठार

इस्लामी दहशतवाद्यांचा रशियावर हल्ला, 115 ठार

रशियाची राजधानी मॉस्कोमधील प्रचंड गर्दी असलेल्या कॉन्सर्ट हॉलमध्ये दहशतवाद्यांनी शुक्रवारी मध्यरात्री केलेल्या भीषण हल्ल्यात 115 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, तर 145 जण गंभीर जखमी झाले असून यातील 60 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मध्यरात्री कॉन्सर्ट हॉलमध्ये शिरलेल्या सात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करीत स्फोटकेही फोडली. घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असून या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट गुपने घेतली
आहे.

मॉस्कोमध्ये म्युझिक कॉन्सर्टसाठी मध्यरात्री हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी सहा ते सात दहशतवादी अचानक या ठिकाणी पोहोचले. दहशतवाद्यांनी हॉलचे दरवाजे बंद करीत एकाच वेळी गोळीबार सुरू केला. त्यांनी आधी सुरक्षारक्षकांवर हल्ला केला. दहशतवादी तब्बल 15 ते 20 मिनिटे गोळीबार करीत होते. यानंतर कॉन्सर्ट हॉलमध्ये स्फोटके फोडली. यामुळे हॉलमध्ये भीषण आग लागल्याने एकच हाहाकार उडाला. नागरिकांनी मिळेल त्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू!
– हल्ला झालेल्या कॉन्सर्ट हॉलमध्ये काही जण अडकल्याने रशियन सैन्याकडून त्यांना रेस्क्यू करण्याचे काम केले जात आहे. दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू करण्यात आले असून हॅलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येत आहे.

– आतापर्यंत चार दहशतवाद्याला पकडण्यात यश आले. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मॉस्कोत कडक सुरक्षा ठेवण्यात आली असून शहरातील सर्व सिनेमागृहे, संग्रहालये बंद ठेवण्यात आली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;