Sindhudurg News – शेत जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी, कणकवली पोलिसात गुन्हा दाखल

Sindhudurg News – शेत जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी, कणकवली पोलिसात गुन्हा दाखल

वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना कणकवलीतील हुंबरट-पिंपळवाडी येथे घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीवरून कणकवली पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

विठोबा तुकाराम मर्ये यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेत जमिनीत चिखलनी करीत असताना मंगेश मर्ये आणि त्यांची पत्नी ममता मर्ये यांनी मला विरोध करत शिवीगाळ केली. तसेच मला आणि माझा पुतण्या कैलास मर्ये याला लोखंडी कोयत्याच्या उलट्या बाजूने व लाकडी दांड्याने मारहाण केली. याप्रकरणी मंगेश तुकाराम मर्ये आणि ममता मंगेश मर्ये यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश तुकाराम मर्ये यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वडिलोपार्जित जमिनाचे वाद सुरू आहेत. असे असताना दिलीप तुकाराम मर्ये, कैलास तुकाराम मर्ये, विठोबा तुकाराम मर्ये, वर्षा विठोबा मर्ये, दिलीप मनोहर हुले ही मंडळी शेत जमिनीत काम करीत होते. याबाबत मी त्यांना विचारणा केली. या रागातून त्यांनी मला आणि पत्नी ममता हिला शिवीगाळ करीत खोऱ्याने मारहाण केली. कैलास मर्ये याने हुंबरट-पिंपळवाडी येथे उभी असलेल्या कारवर दगड टाकून नुकसान केले. याप्रकरणी दिलीप मर्ये, कैलास मर्ये, विठोबा मर्ये, वर्षा मर्ये, दाजी हुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शेगडे हे करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;