जीवनवाहिनी ठरली मृत्यूवाहिनी, गेल्या पाच महिन्यात लोकल अपघातात 922 जणांचा मृत्यू

जीवनवाहिनी ठरली मृत्यूवाहिनी, गेल्या पाच महिन्यात लोकल अपघातात 922 जणांचा मृत्यू

गेल्या पाच महिन्यात रेल्वे अपघातात 922 जणांचा मृत्यू झाला आहे. इतकंच नाही तर लोकलमधून पडून या पाच महिन्यात 210 जणांचा मृत्यू झाला आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.

प्रवाशांच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते आणि प्रवाशांनी लोकलमध्ये वाढत जाणाऱ्या गर्दीबाबात चिंता व्यक्त केली आहे. तसेच लोकलच्या अपूऱ्या फेऱ्या, फलाटांवर असलेला सुरक्षेचा अभाव यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. अजय बोस यांनी याबाबत माहिती अधिकारातून ही माहिती मागवली होती. ही फक्त आकडेवारी नाही तर प्रवाशांच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याचे सांगितले. दरोर एका निष्पाप प्रवाशाचा बळी जात असल्याचेही त्यांनी म्हटले.

712 अपघाती मृत्यू विविध कारणांमुळे झाले, त्यामध्ये रेल्वे रुळ ओलांडणे हे प्रमुख कारण होते. मुंबईची उपनगरी रेल्वे सेवा दररोज पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गांवर मिळून 70 लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;