कोपरगावात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, व्हिडीओ काढून खंडणीची धमकी

कोपरगावात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, व्हिडीओ काढून खंडणीची धमकी

कोपरगाव शहरात एका अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक संबंध ठेवत, त्याची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अजय गणेश पाटील व रुपेश ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2019 मध्ये ब्रिजलाल नगर मधील फ्लॅटवर तसेच गेल्या महिन्यात हॉटेल किशोर अँन्ड येथे, मार्च 2024 रोजी ब्रीजलाल नगर जवळील मोकळया जागेतील काटवनात आरोपी अजय याने त्याचा मित्र रुपेश याच्या मदतीने फिर्यादी सोबत वेळोवेळी फिर्यादीच्या मर्जीच्या विरोधात अनैसंगिक संभोग करुन त्याचा व्हिडीओ काढला. तसेच तो व्हिडीओ व्हायरल न करण्याच्या बदल्यात तीन लाख रुपयांची खंडणी मागून फिर्यादीस तसेच त्याच्या आई वडिलांना फोनवर तसेच समक्ष शिवीगाळ केली. पीडित अल्पवयीन मुलाने याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये धमकी देणे खंडणी मागणे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. विश्वास पावरा हे पुढील तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;