अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी त्यांना सुनावलेल्या ईडी कोठडी विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यावर तत्काळ सुनावणीची मागणी केली होती. त्यांची तत्काळ सुनावणीची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मनमोहन यांनी ही याचिका फेटाळून लावली.

केजरीवाल यांनी त्यांच्या ईडी कोठडीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी सुनावणी व्हावी अशी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे.

मोदी सरकारची हुकूमशाही आणि दडपशाही सुरूच असून निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने ईडीच्या आडून आज शिखंडी डाव टाकला. दोन तासांच्या चौकशीचा फार्स करून ईडीने रात्री उशिरा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. दिल्लीतील नाटय़मय घडामोडीनंतर आपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तुरुंगात असले तरी केजरीवालच मुख्यमंत्री असतील, असे ठणकावत लढणार व भाजपला धडा शिकवणार, असा निर्धार आपने केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;