राजे नाराज असल्याच्या चर्चेने भाजपच्या पोटात भीतीचा गोळा, भाजप नेते उदयनराजेंच्या भेटीला

राजे नाराज असल्याच्या चर्चेने भाजपच्या पोटात भीतीचा गोळा, भाजप नेते उदयनराजेंच्या भेटीला

सातार्‍याची लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले उदयनराजे भोसले गेल्या 72 तासांपासून अमित शहांच्या भेटीसाठी ताटकळले आहेत. शहांची भेट होत नसल्याने राजे नाराज असल्याचे कळताच भाजपच्या पोटात भीतीचा गोळा उठला. जागा वाटपासाठी दिल्लीत गेलेल्या महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी चर्चा सोडून राजेंचा बंगला गाठला आणि त्यांची मनधरणी केली.

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत सातार्‍यातून संधी मिळेल अशी आशा उदयनराजे भोसले यांना होती. भाजपने त्यांना ठेंगा दाखवला. त्यामुळे नाराज झालेल्या राजेंनी दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीचा वेळ मागितला. मात्र तीन दिवस उलटूनही शहांनी उदयनराजेंना भेट दिली नाही. भाजप श्रेष्ठी उदयनराजेंना भेटत नसल्याची बातमी महाराष्ट्रात पसरली. अगोदरच मराठा आरक्षणामुळे भाजप अडचणीत आहे. त्यात उदयनराजेंची अशी अवहेलना होत असल्याचे पाहून मराठा समाजाच्या नाराजीत भर पडली. त्याचा परिणाम लोकसभेच्या मतदानावर होऊ शकतो हे लक्षात येताच भाजपच्या पोटात भीतीने गोळा आला.

जागा वाटपासाठी गेलेल्या देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे तसेच आशिष शेलार यांनी दिल्लीत पाय ठेवताच थेट उदयनराजेंचा बंगला गाठला. भाजप नेत्यांनी उदयनराजेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र राजेंनी आपण सातार्‍याची जागा लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितल्याने या त्रिकुटाचा निरूपाय झाल्याचे वृत्त आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;