‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत पंकजा मुंडे यांना मराठा बांधवांनी दाखवले काळे झेंडे
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्या बीड जिल्ह्यातील गावांचा गाठीभेटी दौरा करत आहेत. आज शनिवारी श्रीक्षेत्र संस्थान नारायणगड येथे श्रीनगर नारायण महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी त्या आलेल्या होत्या. यावेळी त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले.
यावेळी त्यांना गडावरून खाली उतरल्यानंतर साक्षाळपिंप्री येथे मराठा बांधवांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. त्याच पद्धतीने एक ‘मराठा लाख मराठा’च्या घोषणा देखील देण्यात आल्या. पंकजा मुंडे यांच्यासमोर येत मराठा समाजबांधवांकडून जोरदार घोषणा देण्यात आल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List