हिमाचल प्रदेशमधील ‘त्या’ सहा काँग्रेस आमदारांचा भाजपात प्रवेश

हिमाचल प्रदेशमधील ‘त्या’ सहा काँग्रेस आमदारांचा भाजपात प्रवेश

राज्यसभा निवडणूकीत काँग्रेसकडे बहुमत असतानाही ऐनवेळी त्यांच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने काँग्रेसचे उमेदवारी अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला होता. त्या सहा आमदारांनी शनिवारी दिल्लीत भाजपात प्रवेश केला. या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे त्यांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविले होते.

दरम्यान त्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर 1 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्या निवडणूकीत जर या जांगांवर काँग्रेस उमेदवार जिंकून आले नाही तर त्यांचे सरकार कोसळू शकते.

अपक्षांची हेराफेरी

आशिष शर्मा (हमीरपूर मतदारसंघ), होशियार सिंग (डेहरा) आणि केएल ठाकूर (नालागढ) या तीन अपक्ष आमदारांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 2022 च्या विधानसभा निवडणूकीत या आमदारांनी भाजपकडे तिकीट मागितले होते. मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारलेले. त्यानंतर अपक्ष लढून त्यांनी भाजपच्या उमेदवाराला हरवत निवडणूक जिंकली होती. त्यानंतर या अपक्षांनी काँग्रेसच्या सरकारला पाठिंबा दिला होता.

विधानसभेतील संख्याबळ

सध्या हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत काँग्रेसचे 34 आमदार आहेत. तर भाजपचे 25 आमदार आहेत. काँग्रेसच्या सहा आमदारांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे..

पोटनिवडणूकीवर सत्तांतर अवलंबून

सहा जांगावर होणाऱ्या पोटनिवडणूकीत जर काँग्रेसने त्या सहा जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसचे सरकार तरू शकेल. मात्र जर भाजप या सहाही जागांवर जिंकली तर विधानसभेतील भाजपची संख्या 31 व तीन अपक्षांचा पाठिंबा अशी 34 होईल. मात्र भाजप जरी जिंकली तरी त्या वेळी दोन्ही पक्षांकडे 34-34 असे समान संख्याबळ असणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;