Viral Video : मेट्रोत होळी खेळताना दोन तरुणी बनवत होत्या Reel, केला अश्लील डान्स!
गेल्या वर्षभरात दिल्ली मेट्रो विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. दिल्ली मेट्रोमधील बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कधी नवरा बायकोचं भांडण, कधी मारामारी तर कधी सेलिब्रिटींचा प्रवास. मात्र यावेळेस दिल्ली मेट्रो चर्चेत आली आहे ते दोन तरुणींच्या अश्लील डान्स मुळे. या तरुणींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.
दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दोन तरूणी मेट्रोमध्ये खाली बसून “मोहे रंग लगा दे रे” या गाण्यावर एकमेकांना अश्लीलरीत्या रंग लावताना दिसत आहेत. त्यांच्या या कृत्यामुळे वादाला तोंड फुटले आणि दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली. त्या मुलींचा डान्स इतका अश्लील होता की सहप्रवाशांना सुद्धा आपले तोंड फिरवावे लागले. सर्व स्तरातून या दोन तरुणींवर टीका केली जात आहे. तसेचं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List