जी. साथीयान टेटे स्पर्धेत विजेता

वृत्तसंस्था/ लेबनॉन

बैरुत येथे झालेल्या विश्व टेबल टेनिस फेडरेशनच्या फीडर सिरीज टेटे स्पर्धेत भारताचा पुरुष टेटेपटू जी. साथीयानने एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. विदेशातील टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद मिळवणारा साथीयान हा पहिला भारतीय टेबल टेनिसपटू आहे.

या स्पर्धेच्या शेवटच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जी. साथीयानने आपल्या देशाच्या मानव ठक्करचा 3-1 अशा गेम्समध्ये (6-11, 11-7, 11-7, 11-4) असा पराभव केला. या स्पर्धेमध्ये साथीयानने भारताच्या पाचव्या मानांकित हरमित देसाईचा 15-13, 6-11, 11-8, 13-11 तर त्यानंतरच्या सामन्यात टॉप सिडेड चुयाँग युआनचा 11-8, 11-13, 11-8, 11-9 असा पराभव करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

या स्पर्धेमध्ये महिलांच्या विभागात झिया लियान नी हिने एकेरीचे जेतेपद मिळवताना सू वॉनचा 11-9, 11-5, 11-5 अशा गेम्समध्ये पराभव केला. या स्पर्धेत भारताच्या मानव ठक्कर आणि मनुष शहा यांना पुरुष दुहेरीमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अँडी परेरा आणि जॉर्ज कांपोस यांनी मानव ठक्कर आणि शहा यांचा 5-11, 11-7, 13-11, 14-12 असा पराभव केला. दिव्या चितळे आणि मनुष शहा यांनी मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकावताना अंतिम सामन्यात मानव ठक्कर व अर्चना कामत यांचा 3-1 (11-6, 10-12, 11-6, 11-6) असा पराभव केला.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;