झाम्पाच्या जागी तनुष कोटीयान मुंबई संघात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. आता या स्पर्धेत सहभागी झालेल्या राजस्थान रॉयल्स संघातील ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडॅम झाम्पाने काही वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतल्याने त्याच्या जागी मुंबई रणजी संघातील तनुष कोटीयान याचा समावेश करण्यात आला आहे. राजस्थान रॉयल्सच्या फ्रांचायझीनी कोटीयानला 20 लाख रुपये बोलीवर खरेदी केले आहे.

गेल्या वर्षीच्या आयपीएल हंगामात झम्पाने राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधीत्व करताना 6 सामन्यातून 8 बळी मिळवले होते. गेल्या वर्षी राजस्थानने झाम्पाला 1.5 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते. राजस्थानच्या फ्रांचायझीनी झाम्पाला तेवढ्याच रकमेवर पुन्हा यावर्षी संधी दिली होती. दरम्यान झम्पाने काही वैयक्तिक कारणास्तव आपण या स्पर्धेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे कळवल्याने तनुष कोटीयानला त्याच्याजागी संघात स्थान देण्यात आले आहे. 25 वर्षीय कोटीयानने 2024 च्या रणजी हंगामात मुंबईला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. कोटीयानची या स्पर्धेत मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली होती. कोटीयानने फलंदाजीत 502 धावा तर गोलंदाजीत 29 गडी बाद केले.

गुजरात टायटन्स संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे. रॉबिन मिंझच्या जागी कर्नाटकाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज बी. आर. शरथ याला बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;