इंग्लंड महिला संघाचा सलग दुसरा विजय

पाच सामन्यांची टी-20 मालिका : न्यूझीलंड 15 धावांनी पराभूत

वृत्तसंस्था/ नेल्सन

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत येथे शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने यजमान न्यूझीलंडचा 15 धावांनी पराभव करत आपला सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयामुळे इंग्लंडने न्यूझीलंड महिला संघावर 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. इंग्लंडच्या हिदर नाईटला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंड महिला संघाने 20 षटकात 7 बाद 149 धावा जमवल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 20 षटकात 8 बाद 134 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 15 धावांनी गमवावा लागला.

सध्या इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर टी-20 मालिका खेळत आहे. इंग्लंड संघाने या आपल्या दौऱ्याला विजयाने शानदार प्रारंभ करताना या मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. शुक्रवारच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या डावामध्ये कर्णधार नाईटने 40 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 56 धावा जमवल्या. ब्युमाँटने  13 चेंडूत 3 चौकारांसह 19, बुचरने 20 चेंडूत 1 चौकारांसह 12, गिब्सनने 12 चेंडूत 2 चौकारांसह 14, चार्ली डीनने 14 चेंडूत 1 चौकारांसह 16 आणि सारा ग्लेनने 6 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 13 धावा जमवल्या. इंग्लंडच्या डावात 2 षटकार आणि 14 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडच्या डावामध्ये पहिल्या पॉवरप्लेमध्ये 6 षटकात 34 धावा जमवताना 2 गडी गमवले. इंग्लंडचे अर्धशतक 55 चेंडूत, शतक 95 चेंडूत फलकावर लागले. न्यूझीलंडतर्फे सोफी डिव्हाईन आणि मेयर यांनी प्रत्येकी 2 तर ताहुहु, जोनास आणि अॅमेलिया केर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावामध्ये अॅमेलिया केरने 36 चेंडूत 5 चौकारांसह 44, बेट्सने 13 चेंडूत 4 चौकारांसह 19, डिव्हाईनने 14 चेंडूत 2 चौकारांसह 17, ग्रीनने 16 धावा तर ताहुहुने 9 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 15 धावा जमवल्या. न्यूझीलंडच्या डावात 13 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडतर्फे लॉरेनबेल आणि चार्ली डिन यांनी प्रत्येकी 2 तसेच गिब्सन, स्मिथ, ग्लेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. न्यूझीलंडने पहिल्या पॉवरप्लेमधील 6 षटकात 48 धावा जमवताना 2 गडी गमवले. न्यूझीलंडचे अर्धशतक 41 चेंडूत तर शतक 87 चेंडूत फलकावर लागले.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 20 षटकात 7 बाद 149 (नाईट नाबाद 56, ब्युमाँट 19, बुचर 12, गिब्सन 14, डीन 16, ग्लेन नाबाद 13, अवांतर 6, डिव्हाईन 2-30, मेयर 2-25, ताहुहु, जोनास, अॅमेलिया केर प्रत्येकी एक बळी), न्यूझीलंड 20 षटकात 8 बाद 134 (अॅमेलिया केर 44, बेट्स 19, डिव्हाईन 17, ग्रीन 16, ताहुहु नाबाद 15, मेयर नाबाद 9, अवांतर 9, बेल 2-24, डीन 2-28, गिब्सन, स्मिथ, ग्लेन प्रत्येकी एक बळी).

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;