एअर इंडियाच्या विमानात दारू पिऊन तरुणाचा धिंगाणा, एअर होस्टेसचा विनयभंग; सीआयएसएफने केली अटक

एअर इंडियाच्या विमानात दारू पिऊन तरुणाचा धिंगाणा, एअर होस्टेसचा विनयभंग; सीआयएसएफने केली अटक

दुबईहून जयपूरला येणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात एका तरुणाने दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणाने एका एअर होस्टेससोबत विनयभंग आणि गैरवर्तन केल्याची घटना घडली. शनिवारी रात्री 3 – वाजता जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर – उतरलेल्या फ्लाइट क्रमांक आयएक्स १९५ मध्ये ही घटना घडली. या प्रवाशाला सीआयएसएफने ताब्यात घेतले आणि नंतर विमानतळ पोलिसांकडे सोपवले.

आरोपी तरुणाचे नाव दिनेश असून, तो विमानात 15 बी क्रमांकाच्या सीटवर बसला होता. दिनेशने विमानात बसताच दारू पिण्यास सुरुवात केली. जेव्हा एअर होस्टेसने त्याला मद्यपान करण्यापासून रोखले, तेव्हा तो प्रचंड चिडला आणि त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच एअर होस्टेसला दमदाटी करत तिच्याशी गैरवर्तन केले. तरुणाने एअर होस्टेसला कुठेही स्पर्श करण्यास सुरुवात केली आणि तिला सातत्याने त्रास देत राहिला. त्यानंतर इतर क्रू मेंबर्सनी त्याला रोखले. त्यामुळे तो त्यांच्याशीही वाद घालत बसला. विमान जयपूरला पोहोचताच सर्व माहिती सीआयएसएफला देण्यात आली. सीआयएसएफने विमान लैंडिंग होताच दिनेशला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला विमानतळ पोलिसांकडे सोपवण्यात आले. एअर होस्टेसच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिनेशविरोधात गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;