महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवासोबत जान्हवी कपूर पोहचली ‘या’ मंदिरात, गुडघे टेकवत चढल्या पायऱ्या, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवासोबत जान्हवी कपूर पोहचली ‘या’ मंदिरात, गुडघे टेकवत चढल्या पायऱ्या, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

मुंबई : बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही सध्या तिच्या चित्रपटांपेक्षाही अधिक तिच्या पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याच्यासोबत नेहमीच स्पाॅट होताना दिसते. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे एकमेकांना डेट करत असल्याचेही सांगितले जाते. मात्र, या दोघांनी कधीही त्यांच्या नात्यावर भाष्य केले नाही. शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू असून कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.

नुकताच जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया आणि आैरी यांच्यासोबत तिरुपती बालाजी मंदिरात पोहचली. यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. नेहमीच तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी जान्हवी कपूर जाते. काही दिवसांपूर्वी बहीण खुशी कपूरसोबत बालाजी मंदिरात जान्हवी पोहचली. यावेळी चक्क गुडघ्यांनी जान्हवी कपूरने पायऱ्या चढल्या.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर, शिखर पहाडिया आणि आैरी हे दिसत आहेत. यावेळी तिघे मंदिरात दर्शनासाठी जाताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पायऱ्या चढून शिखर पहाडिया तर जान्हवी कपूरने गुडघे टेकवत मंदिराच्या पायऱ्या चढल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये साऊथ इंडियन जेवण करताना देखील जान्हवी कपूर ही दिसत आहे.

शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर यांनी सर्वांच्या गुपचूप साखरपुडा केल्याचे सांगितले जात होते. लवकरच शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर लग्न करणार असल्याचेही सांगितले जाते. शिखर पहाडिया हा अंबानींच्या पार्टीत देखील जान्हवी कपूर हिच्यासोबत पोहचला होता, यावेळीचे त्यांचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

काही दिवसांपूर्वीच विमानतळावर बोनी कपूर यांच्यासोबत शिखर पहाडिया हा दिसला. यावेळी चक्क शिखर पहाडिया याचे फोटो काढू नका, हे सांगताना बोनी कपूर हे दिसले. बाॅलिवूडच्या जवळपास सर्वच पार्ट्यांना शिखर पहाडिया हा जान्हवी कपूर हिच्यासोबत दिसतो. शिखर पहाडिया आणि शिखर पहाडिया हे काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;