VIDEO आपचे नेते रस्त्यावर झोपले, पोलिसांना म्हणाले ‘घाला गोळ्या’
मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांना गुरुवारी सक्तवसुली संचलनालयाने अटक केली. सध्या त्यांची न्यायालयाने 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीत रवानगी केली आहे. केजरीवाल यांच्या अटकेविरोधात सध्या देशभरात आप कार्यकर्त्यांची आंदोलनं सुरू आहेत. अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्लीत तर 144 कलम लागू केले आहे.
कायर मोदी इतना डर गया है कि वो अब AAP को चुनाव नहीं लड़ने देना चाहता
AAP मंत्री @AtishiAAP को भी पुलिस जगह-जगह रोक रही है
मोदी जी एक काम करो, सब AAP नेताओं और कार्यकर्ताओं को गोली मार दो, आपका काम आसान हो जाएगा
वरना अगर AAP नेता और कार्यकर्ता ज़िंदा रहे तो तुम्हें सुकून से… pic.twitter.com/wUQOHjoYkV
— AAP (@AamAadmiParty) March 23, 2024
या दरम्यान शनिवारी दिल्लीच्या मंत्री व आप नेत्या आतिषी मार्लेना या त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पक्ष कार्यालयातून घरी जात असताना त्यांची गाडी पोलिसांनी अडवली. त्या पक्ष कार्यालयात जात असताना देखील त्यांची गाडी अडवण्यात आली होती. त्यावरून आप कार्यकर्ते भडकले. आतिषी यांच्यासोबत आलेले सौरभ भारद्वाज, आदिल अहमद खान, दुर्गेश पाठक हे पोलिसांचा निषेध करत रस्त्यावर झोपले व अशा प्रकारे अत्याचार करण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला. अशी हुकुमशाही करण्यापेक्षा सर्व विरोधकांना एका रांगेत उभे करून गोळ्या घाला, असे त्यांनी पोलिसांना सुनावले.
पोलिसांनी अडवल्यामुळे संतापलेल्या आतिषी मार्लेना यांनी पोलिसांना चांगलेच धारेवर घेतले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतिषी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून पोलिसांनी त्यांना जाऊ दिले.
शनिवारी सकाळी आप व इंडिया आघाडीकडून शहीदी पार्क येथे एकत्र येऊन मोदी सरकारविरोधात निदर्शने करण्यात येणार होते. त्यानिमित्ताने आपच्या नेत्यांच्या गाड्या अडवल्या जात होत्या असे समजते.
पोलिसांना आम्हाला थांबवण्याचा काय अधिकार – आतिषी
”मी, सौरभ भारद्वाज, आदिल अहमद खान, दुर्गेश पाठक आम्ही पार्टी ऑफिसवरून माझ्या घरी जात होते. त्यावेळी माझा चेहरा बघून पोलिसांनी आमची गाडी रोखली. ही काय हुकुमशाही आहे. आम्ही काय यांना सांगून जायचे का? पोलिसांना काय अधिकार आहे आम्हाला असं रोखण्याचा व थांबवण्याचा? असा सवाल आतिषी यांनी केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List